आयुष्य
पहाटेच्या गो-या तांबूस वेळी
कष्टात माखून धूळ धूळ झालेला
तिचा चेहरा पाहीपर्यंत,
मी ही समजत होतो
आयुष्य दिवसात मोजतात
वर्षांत तोलतात.
कष्टात माखून धूळ धूळ झालेला
तिचा चेहरा पाहीपर्यंत,
मी ही समजत होतो
आयुष्य दिवसात मोजतात
वर्षांत तोलतात.
कळतय की
दोन रात्रींमधला
उठून झोपेपर्यंतचा
निरर्थक प्रकाशाचा तुकडा
वाढला म्हणजे
आयुष्य वाढतच असं नाही.
दोन रात्रींमधला
उठून झोपेपर्यंतचा
निरर्थक प्रकाशाचा तुकडा
वाढला म्हणजे
आयुष्य वाढतच असं नाही.
आयुष्य मोजायचं असतं
भुकेमुळे पोटात वाढणार्या
कळांमध्ये,
दारूड्या बापाने मारल्यावर
पाठीवर उमटणार्या
वळांमध्ये,
बांधावरून एकटं चालतांना
ऐकू येणार्या शीळांमध्ये.
भुकेमुळे पोटात वाढणार्या
कळांमध्ये,
दारूड्या बापाने मारल्यावर
पाठीवर उमटणार्या
वळांमध्ये,
बांधावरून एकटं चालतांना
ऐकू येणार्या शीळांमध्ये.
सशाचं पिलू ट्रकखाली
चिरडून मरावं
तसा तिचा आषाढ श्रावण
कधीच मेला.
चिरडून मरावं
तसा तिचा आषाढ श्रावण
कधीच मेला.
आजकाल
रात्री झोपताना
चंद्राकडे पाहात
ती कसला तरी
हिशेब करीत असते
एकही नि:श्वास न टाकता.
रात्री झोपताना
चंद्राकडे पाहात
ती कसला तरी
हिशेब करीत असते
एकही नि:श्वास न टाकता.
- अभिजीत कदम.
Comments
Post a Comment