मुख्याधिकारी होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षक म्हणून काही वर्षे काम केले होते तेव्हाचा हा प्रसंग आहे .मी तो कधी विसरु शकत नाही.तर घडले असे
मी तेव्हा सुरगाणा या आदिवासी व दुर्गम तालुक्यात काम करत होतो. छोटे आदिवासी खेडे होतं. एक डोंगर एक नदी भाताची शेती खुरासणीची पिवळीधम्मक फुलं ,असा एकूण नजारा.
शाळेचे मुख्याध्यापक दीर्घ रजेवर गेले होते आणि प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मला काम पहावे लागणार होते .मग मी जरा अधिक सभ्यपणे ,आधिक हुशारीने वागायचे ठरवले.तसा मी जन्मापासून हुशारच आहे ,(पण ही बाब काहींना मान्य नाही असो)
मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर मी रुबाबात बसलो होतो, तेवढयात एक अडाणी खेडूत शाळेत आला .मला मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर पाहून त्याला आश्चर्य वाटले
"गुर्जी तुमी कधीपासून हेडमास्तर झाले?"
"अहो काका आपले मुख्याध्यापक रजेवर आहेत ,आणि मी आता इथला प्रभारी मुख्याध्यापक आहे"
"काय ? परभारी ..मुख्याध्यापक आन हे काय आसतं?
"आहो परभारी नाही ... प्रभारी"
मी समजून द्यायचा प्रयत्न करायला लागलो.
"गुर्जी आमी आहो आडाणी लोक. जरा समजून सांगा प्रभारी मंजे काय आसतं?
मग त्या अज्ञ मानवाला मी प्रेषिताच्या आवेशात 'प्रभारी' या शब्दाचा अर्थ समजून सांगू लागलो.
"म्हंजे काका एखादे महत्त्वाचे पद तात्पुरत्या कारणाने रिक्त असेल तर मग दुसऱ्या माणसाला त्याचा कार्यभार सोपवतात. वगैरे वगैरे ....
माझे बोलणे शांतपणे ऐकून तो म्हणाला
"गुर्जी आवो येवढी लांबण कशाला लावता??
सरळ सांगा ना प्रभारी मंजे... ...... बैल नव्हता ..म्हणून.... हेला ....जुपला
एवढे बोलून तो निघून गेला
आजही एखाद्या प्रभारी पदावर काम करायची वेळ आली की मला ते शब्द आठवतात प्रभारी म्हणजे
बैल नव्हता .... 

Comments

Popular Posts