तो एक शिक्षक आहे.टोक्योतील एका शाळेत शिकवणारा.कीटकांच्या अभ्यासात रमणारा.कीटकांच्या एक दुर्मिळ प्रजातीचा शोध घेता घेता तो पोचतो एका वाळवंटी खेड्यात.सभोवताली सर्वत्र वाळूच वाळू.अचानक त्याच्या लक्षात येते की शेवटची बस निघून गेली आहे.आता रात्र इथेच काढावी लागणार आहे.निवा-याचे ठिकाण शोधत असतांना त्याची भेट गावक-यांशी होते .ते त्याला सुचवतात एक घर.वाळूच्या वाळवंटातील एका खोल खड्डयातील एक घर .ज्यात एक तरुण विधवा राहते आहे.खड्ड्यात उतरण्यासाठी चढण्यासाठी एकच व्यवस्था आहे ती म्हणजे दोरापासून बनवलेली एक कमकुवत शिडी.शिडीवरुन खाली उतरुन तो रात्र घालवतो आणि सकाळी त्याच्या लक्षात येतंय की शिडी नाहीशी झाली आहे.आणि तो कैदेत सापडला आहे.ही आहे पार्श्वभूमी Woman in the dunes या चित्रपटाची. चित्रपट Kobo Abe या लेखिकेच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.कृष्ण धवल आहे.अस्तित्ववादी किंवा surrealistic म्हणता येईल अशा शैलीतला.एखाद्या अन्वयसमृद्ध रुपककथेसारखा किंवा अन्वयनाच्या अनेक शक्यता बाळगणा-या तरल भावकवितेच्या तोडीचा हा चित्रपट आहे.चित्रपट बघितल्यानंतर आपण अस्वस्थ होतोच पण आपलीच मूल्यव्यवस्था तप...
Search This Blog
Abhijit Kadam