हे प्रिय,
भावनांच्या कल्लोळ हृदयात उसळत असलेल्या निरोपाच्या या कातरवेळी तुझे सुंदरसे पत्र मिळाले आणि तुझ्या शुभेच्छांचा परीसस्पर्श आमच्या आयुष्याला झाला आणि आम्ही मोहरुन गेलो .नातं जपणं ,ते टिकवून ठेवणं,साध्या साध्या गोष्टी साठी सुद्धा अंतःकरणापासून एखाद्याचे कौतुक करणे या दुर्मिळ गोष्टी तू किती सहजपणे करतेस याचा प्रत्यय आला.
ऐसी कळवळ्याची जाती
करी लाभावीण प्रीती
या तुकारामाच्या ओळी मनात तरळून गेल्या .या कळवळ्याची जातीची तू आहेसच तू जिथे जाशील तिथे तू इतरांचे आयुष्य समईच्या मंद उजेडासारखे उजळून टाकशील.तू आमच्या गटातील सुंदर सात्त्विका आहेस.
तू आहेस
तशीच आयुष्यभर रहा

Comments
Post a Comment